Loading
| |
|
यत्र-तत्र लेखमालाः यत्र-तत्र लेखमाला - दोषी... लेखक: बिपीनचंद्र नेवे, जळगाव उधळीत यौवन, मंचावर अवतरली मत्त प्रमदा गात्रात उफाळे मदन, नेत्रात वारूणी, मादक अदा मदमस्त रोखुनी कटाक्ष, झोकात ही चालते हाय, काळजात हळुवार, ही मदनमंजीरी शिरते !! १ !!
लेवुनी साज, मौक्तिक, रत्न आभुषणे सोनसळी कायेवर, रेशीम वस्त्र प्रावरणे मुक्त व्हावया पाहे, यौवनाभार, जो जो आवरता शिणली ही नाजूक तनु, वस्त्राभार सावरता !! २ !!
अन अदभुत ते घडले, पाहुनी निवली नयने त्यागुन तनुला, गळली ती चावट वसने उघडी क्षणभर, बिलोरी आरसापानी काया शतजन्मीची लागती पुण्ये, ऎसे दर्शन व्हाया !! ३ !!
खडबडुनी जाहले जागी, सुस्त सरकार फर्माने सुटली, हुडकाया गोड गुन्हेगार कोणाकडुन जाहली ही नयनमधुर चूक? चौकशीत पातला दोषी (बिचारा) कंचुकीचा हूक !! ४ !! |
News Archive
Feedback
|
About Us | Disclaimer | Privacy Policy | Contact us |