Quick Links

Industries/ Business/ Trade Info

Educate in Jalgaon

Schools in Jalgaon


Welcome Tourist!

Around Web:

Ajanta Caves

Ellora Caves

यत्र-तत्र मराठी लॆखमाला

Jalgaon Shop

City Helplines

Emergency Info

Quick Links

Industries/ Business/ Trade Info

Educate in Jalgaon

Schools in Jalgaon


Welcome Tourist!

Around Web:

Ajanta Caves

Ellora Caves

यत्र-तत्र मराठी लॆखमाला

Jalgaon Shop

City Helplines

Emergency Info

Jalgaon's complete reference - EJalgaon.com

Loading

यत्र-तत्र लेखमालाः

Index


यत्र-तत्र लेखमाला - हॅप्पी न्यु इयर!

लेखक: धनलक्ष्मी

काही (बि)घडलेल्या गोष्टी आणि काही येणार्या काळात (बि)घडणार्या घटनांबद्दल:

१. सर्जीकल स्ट्राईक ही पद्धत फार प्राचीन असून, नोटबंदीच्या फार पूर्वीपासूनच नवर्यांच्या खिश्यावर आयाबाया सर्जीकल स्ट्राईक करण्यात माहीर असल्याचे कळले आहे. (आपापल्या नवर्यांच्याच बर्का, कृ.गै.न.) हीच पद्धत नोटबंदीच्या काळात काही नवर्यांच्या अतिशय कामी आली असेही कळते. त्यांनी बायकांच्या पर्समधल्या चोरकप्प्यांवर अशीच धाड घातली, असे आमचे गुप्तचर कळवितात.

२. जगाचे फ्युचर 'इंडिया' असल्यामुळे, Siri आणि Cortana मध्ये भावगीत स्पर्धा व्हावी, की नाट्यगीत स्पर्धा व्हावी, ह्यावर गंभीर चर्चा चालू असल्याचे कळते. लवकरच सुरु होणार्या 'दिल है हिंदुस्तानी' ची कल्पनादेखील या चर्चेतून पुढे आल्याचे कळते!

३. निरनिराळ्या रंगाच्या पिझ्झास्पर्धेमध्ये, सध्या आघाडीवर असलेल्या 'अस्सल गृहिणी' पिझ्झाला सर्वत्र मान्यता मिळत आहे. त्यांच्या यशाचे रहस्य अतिशय हेल्दी टॉपिंगमध्ये दडले असल्याचे त्या कंपनीच्या कर्त्यासवर्त्यांनी कळविले आहे. त्यांच्याच शेजारी राहणार्या कुलकर्णी बाईंचा मात्र - ते फक्त पोळीवरती रोजचीच भाजी घालून देतात, असा दावा केला आहे!!

४. रोबोने कार चालवितांना, siri शी chat करत असल्यामुळे, रस्त्याच्या कडेला झोपलेल्यांवर चाकं फिरविल्याची घटना नुकतीच घडली आहे. पुढे जाऊन आपण लवकरच काळवीट नाहीतर हरीणाची शिकार लवकरच करू, असंही या रोबोने एका वृत्तपत्राच्या मुलाखतीत सांगितले आहे.

५. एका bath-products तयार करणार्या कंपनीने एक फारच 'effective' bath pill उर्फ आंघोळीची गोळी तयार केली आहे. ही गोळी 'न्यु इयर स्पेशल' असून, ३१ डिसेंबरच्या die-hard party नंतर १ तारखेच्या पहाटे हिचा फार्फार उप्योग होईल, असा दावा कंपनी करत आहे.

आमचे गुप्तचर सर्वत्र तैनात असून आम्हाला वेळोवेळी अश्या खास वार्ता, केवळ तुमच्यासाठीच आम्हाला कळवत असतात. जर तुम्हालाही यात सहभागी व्हायचे असेल तर प्रतिसादात कळवा अथवा ई-मेल करा - dhanalaxmiwrites@gmail.com

मधून मधून दात स्वच्छ करत रहा आणि नंतरच हसा! ;)

Wish you a very happy new year!

~ धनलक्ष्मी

News Archive
Feedback

About Us | Disclaimer | Privacy Policy | Contact us