Loading
| |
|
यत्र-तत्र लेखमालाः यत्र-तत्र लेखमाला - कशी मी त्यजु ह्या पदाला (एक (बेसुर) संगीतिका) लेखक: बिपीनचंद्र नेवे, जळगाव मनमोहन सिंग: लाभाची पदे भूषवू आपण एक, नव्हे! दोन, तीन, चार, चला मित्रहो मिळून आपण घेऊ बॆठक, करू विचार
म्याडम: मला काही नक्को काही काही नक्को पहात काय बसलात ही मी मारते लाथ
राहुल: आई तुझे बरोबर
प्रियांका: हो, हो, बरोब्बर
दोघेही: आमची आई महान तुम्ही सर्व लहान
म्याडम: मला काही नक्को काही काही नक्को मला तुम्ही समजलात काय? माझा यात काहीच स्वार्थ नाय.
काँग्रेस्जन (मुख्यत्येकरून लाभार्थी): चला रे चला, सवंगड्यानो चला म्याडमच्या मागे मागे ~हाउया चला म्याडम्चे हात मजबूत करू (आवेशात) खुशाल पदाला लाथ मारू (स्वगत) लाथ मारायची होत नाही हिंमत देईल का पुन्हा कोणी मला मत?
(प्रकट) म्याडम, ही आम्ही मारतो लाथ हां आम्ही मारतो लाथ ही आम्हीपण मारतो लाथ अयाईग, पाय का देत नाहीत साथ?
म्याडम: बंद करा ही तुमची थेर तुम्ही अजून आहात लहान लहान पोर अरे, मी निवडून येणार याची मला खात्री हाय तुम्ही कशाला चालतायत उगीचच फाटक्यात पाय?
कम्युनिस्ट: अहो, थांबा, थांबा थांबा भाऊ नका राजीनामे देऊ आपणच आपली वळखुन ऎपत चूपचाप बसून राहू रे भाऊ कशाला करतायेत नसत डेअरिंग? संभाळा जरा आपल्या घशाच बेअरिंग.
भाजपेयी: (स्वगत) केला तुका नि झाला माका प्रसंग हा आला मोठा बाका (कशा बरे कराव्या आता वर खाका?) पडलो तरी नाक वर ठेवावे कसे? नाही तर होईल आमचे सगळीकडे हसे, येनकेन प्रकारे यातून निसरायच हाय, जेटलीबाबा, तुझ्यावाचून हे काम जमायच न्हाय
जेटली: या मुलांनो गोष्टी सांगतो तुम्हा युक्तीच्या चार हातामध्ये घेऊन बोरू व्हा तुम्ही तयार
सुचना: ठेवलाय कारे तो क्यामेरा नीट? अरे जरा कमी करा खोली मधली हीट पाण्याचा ग्लास ठेवलाय ना भरून? अरे माईक जरा दूर ठेवा माझ्यापासून
प्रास्ताविक: हं आता मी काय सांगतोय नीट ऎका आणी अवघड प्रश्न मुळ्ळीच विच्चारू नका आपसात मारू नका अजीबात गप्पा देईल मी ठेवून नाहीतर डोक्यावर टप्पा हं रेडी? रेडी
निवेदन: समजु नका याला तुम्ही म्याडमचा त्याग आम्हीच पाडले त्यांना तसे करायला भाग आम्ही म्हणजे, तुम्ही समजलात काय? समजलात काय? (स्वगत: आता इथे काय बोलायच सुचतच नाय)
रास्व सं: या रे या, करू या आपण म्याडमचे गुणगान हुशारीने ओतप्रोत म्याडम ह्यांचा छान नाहीतर हाय, काय ही, आपुले कडील स्थिति जागा अडवून खुशाल बैसले वृद्ध कपी किती
प्रियरंजन दास मुन्शी: नका घालू उगाच गोंधळ, स्वार्थ आपुला समजा फुका कशाला मारता राजीनाम्याच्या गमजा? सहमतीने सोडवूया आपण लाभाचा मुद्दा मग खुशाल घ्या वाटून ज्यास हवा तो हुद्दा
|
News Archive
Feedback
|
About Us | Disclaimer | Privacy Policy | Contact us |