Quick Links

Industries/ Business/ Trade Info

Educate in Jalgaon

Schools in Jalgaon


Welcome Tourist!

Around Web:

Ajanta Caves

Ellora Caves

यत्र-तत्र मराठी लॆखमाला

Jalgaon Shop

City Helplines

Emergency Info

Quick Links

Industries/ Business/ Trade Info

Educate in Jalgaon

Schools in Jalgaon


Welcome Tourist!

Around Web:

Ajanta Caves

Ellora Caves

यत्र-तत्र मराठी लॆखमाला

Jalgaon Shop

City Helplines

Emergency Info

Jalgaon's complete reference - EJalgaon.com

Loading

यत्र-तत्र लेखमालाः

Index


यत्र-तत्र लेखमाला - तुका आकाशाएवढा

लेखक: बिपीनचंद्र नेवे, जळगाव

आमचा दिनक्रम झुंजुमुंजुच्यावेळी म्हणजे पहाटे ५ वाजता होतो हे वाचुन तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल (खुशाल वाटो) पहाटे पाचलाच आमच्या घडयाळाचा गजर होतो. त्यावेळी हातरुणावर उठुन बसून घडयाळ हातात घेऊन त्याचा गजर आम्ही नाजुकपणे बंद करतो. (आम्ही झोपेतच, पोहतांना मारावे तसे हात मारुन घडयाळ पकडतो व गळा घोटावा तसा त्याचा गजर बंद करतो असे कोणी म्हणाल्यास तिकडे साफ दुर्लक्ष करा.) सकाळी उठावे, योगासने करावी, प्राणायाम करावे. त्याने व्यक्ती (म्हणजे आम्ही) चपळ होतो मग (आम्ही इतक्या चपळपणे गजर बंद करतो त्याचे काय?) त्यांचे (म्हणजे आमचे) शरीर प्रमाणबध्द होते (तुझे शरीर प्रमाणबध्दच परंतु व्यस्त प्रमाण - आमचा एक हितचिंतक) असे आमचे अनेक चाहते व हितचिंतक आम्हास वेळोवेळी सांगत असतात (काही चाहते आम्हास खास ई-मेल पाठवित असतात). त्यामुळे गजर बंद केल्यानंतर आम्ही शवासनात पडून राहतो. (अशा वेळी आम्ही घोरतो असे काही जणांचे म्हणने आहे, परंतु आम्ही घोरत नसून प्राणायामाचा एक प्रकार करीत असतो. शवासनात प्राणायाम हे आमच्या अनेक वर्षाच्या संशोधनाचे फलित आहे.) चहाचा मंद वरवळ नाकी येईस्तोवर आम्ही या स्थितीत पडून राहतो. तोपर्यंत प्रात:काळीचे साडेसात वाजत असतात. अशा प्रकारे पहाटे पाच वाजेपासूनच आमचा दिनक्रम सुरु होत असतो.

बरे, 'काही नेमकेपण आपुले ! बहु जनांशी कळो आले तेची मनुष्य मान्य झाले ! भूमंडळी !!' ही समर्थाची शिकवण आम्ही पुरेपुर अत्मसात केली आहे. त्यामुळे दिलेली वेळ पाळ्याकडे आमचा कटाक्ष आसतो. परंतु अलीकडे काय झाले आहे कोण जाणे. जिथेही आम्ही वेळेवर म्हणून पोहचण्याचा प्रयत्न करतो तेथे वेळ आधीच निघून गेलेली असते. समारंभास वेळेस पोहचावे तर समारंभ आधीच उरकून महाजन पांगण्याचा तयारीत असतात. मग आम्हास टेन्टवाले समजुन दोऱ्या सोडायच्या कामास लावले जाते. लग्नास वेळेवर पोहचावे तर नवरानवरीचे लग्न घाईघाईत उरकून मंडळी भोजनाच्या तयारीस लागलेली असतात (बरा वेळेवर पोहचलास असे काही दृष्ट मित्र म्हणतात) परंतु 'ऎशा नरांकडे देऊ नये लक्ष ! भोजनास दक्ष ! सदोदित !!' या नियमाने आम्ही वागतो. वेळेच्या बाबतीत आमची नेहमी अशी फजिती होत असते. त्यामुळे आम्ही नाही नाही ते उपाय केले. घडयाळ मागे लाऊन पाहीले. घडयाळ पुढे लावून पाहील. दोन्ही हातात घडयाळे घालून पाहीली परंतु जगाचे घडयाळ नेहमीच आमच्यापुढे जात राहीले. अखेर कंटाळून शेवटचा उपाय म्हणून आम्ही पंढरीच्या विठोबापुढे धरणे धरले. या विठ्ठला "आता तुच माझा मायबाप" अशी आर्त हाक आम्ही सदगतित होऊन मारली. महराष्ट्राचे कान चालविणारा हा विठ्ठल आम्हास पावेलच पावेल या विचारात आम्ही निद्राधीन झालो.

सकाळी आम्ही उठलो, आज गजर वाजलाच नाही. कोणीतरी पार्श्चभागावर लचाप्रहर करुन कानात कुजबुजले असा भास झाला. 'उठ झोपलास काय, टेबलावर बघ' ऎसा आवजाने आम्ही टेबलाकडे वळलो. पाहतो तर काय - आमच्या नेहमीच्य गजराच्य घडयळ्याच्या जागी चमचमणारे सुंदर सोनेरी मनगट घडयाळ ! यावर अनेक छोटे छोटे बटणे. हे काय असावे बरे ह्या विचारात आम्ही पडलो. तोच 'मुर्खा शेजारी बघ', असा आदेश आम्हास आला. आम्ही शेजारी पाहीले. तिथे एक मॅन्युअल पडलेले. त्यावर लिहीले होते 'टाईम मशीन - मॅन्युफॅक्चरर - श्री. विठ्ठल, पंढरपुर' . आश्चर्याने आम्ही आ वसला.

'तोंड बंद कर' आवाज आला ' निट ऎक तुला कोणत्याही स्थळी कोणत्याही वेळी उपस्थित राहाता यावे म्हणून तुला आम्ही टाईम मशीन देत आहोत. मुर्खा त्याचा नीट उपयोग कर. आणि काल केली तशी आर्त विनवणी पुन्हा करु नकोस, किती विव्हाळतोस, कानात दडे बसले माझे, तुझ्या विव्हाळण्याने भक्तगण जे पळाले ते अजून गायबच आहेत"

म्हणजे आमची आर्त आळवणी फळास आली तर. आता काय करु व काय नको असे आम्हास झाले. आता कुठे बरे जाऊन स्टिंग ऑपरेशन करावे असे आम्हास झाले. तोच बारावीच्या प्रश्नपत्रीकेतील संत तुकारामांवरचा उतारा आम्हास आठवला. सर्वात अगोदर श्री. विठ्ठलाच्या भक्तालाच, म्हणजे संत शिरोमणी भक्त श्रेष्ठ तुकाराम महाराज यांनाच भेटावे असा विचार आम्ही केला व टाईम मशीन मनगटाला बांधले.

स्थळ - देहू, शतक - सतरावे, वेळ - सकाळची, आम्ही बटने दाबली. क्षणभर आमच्या डोळ्यासमोर आंधार पसरला नंतर उजेड चमकला. दुसऱ्याच क्षणी आम्ही देहून उभे होतो. गावात सकाळ झाली होती. माणसे हातात लोटे घेऊन घाईघाईने बहिर्दिशेने निघली होती. आता कोणाला बरे विचारावे तुकाराम बाबांचे घर ? आमच्या मनात विचार आला. इतक्यात लोटा घेऊन एक इसम आम्हास समोरुन येतांन दिसला. त्यास आम्ही विचरले ' बुवा, तुकाराम महाराज म्हणजे संत श्रेष्ठ तुकाराम महाराज कोठे राहतात ?'

'काय ? तो तुक्या ? आणि तो तुक्या संत श्रेष्ठ कधीपासून झाला ?

स्वत:ला महाराज म्हणवतो काय तो अशिक्षित, अडाणी खेडूत ?' बुवा कडाडले , माझी तर बोलतीच बंद झाली. परंतू मी धीर करुन विचारले 'बोवा, तुम्ही कोण ? ' "मंबाजी म्हणतात मला" बोवा पुन्हा कडादले व चालु लागले.

आता आपणच महाराजांचे घर शोधून घ्यावे असा विचार करुन आम्ही गावात इकडे तिकडे फिरु लागलो. तो एका कुटीरासमोरुन जातांना ओळखीचे अभंग ऎकू आले. 'मऊ मेणाहून आम्ही विष्णुदास' कठीण वज्रास भेदु ऎसे !!'' आम्ही ओळखले हेच महराजांचे घर. आमचा आनंद गगनात मावेना. आम्ही कुटीचे दार ठोठावले. दार उघडले. साक्षात जिजाबाई दारात उभ्या. ''आई आम्हास संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांना भेटायचेय. मी एकवीसाव्या शतकातून महाराजांना भेटावयास आलोय.'' मी माझा परिचय दिला. ''महाराज अस कोणा ऎऱ्या गैऱ्यांना भेटत नाही. तुमच्या परिक्षा विभागाच्या मंडळींनी काय केले ? बारावीच्या प्रश्नपत्रिकेत महाराजांच्या पाणाउतारा करणारा उतारा टाकला ना ?'' जिजाबाई कडाडल्या. बरोबरच होत त्यांचे. कोणत्य पत्नीला आपला पतीला दुषणे दिलेली आवडतील ?

''परंतु आई, आम्हास प्रत्यक्ष विठ्ठलाने पाठविले आहे'' आम्ही नम्रतेने म्हटले.

विठ्ठल या शब्दाने परवलीच्या शब्दाचे काम केले व आतून आवाज आला.

"क्षमा शस्त्र जया नराचिये हाती !

दुष्ट तयाप्रती काय करी !!

तॄण नाही तेथे पडला दावाग्नि !

जाय तो विझोनी आपसया !!

तुका म्हणे क्षमा, सर्वाचे स्वहित !

धरा अखंडित, सुखरुप !!

 

जिजा, येऊ दे त्याला आत"

व आम्ही आत प्रवेश केला. महाराज आत चिपळ्या घेऊण अभंग गात होते. आम्ही म्हाराजांच्या चरणी लोटांगण घातले.

'विठू माऊलीचा तुम्हास आशिर्वाद आहे' परम कृपाळू स्वरात म्हाराजांनी म्हटले.

'महाराज आमच्याकडून घोर अपघात घडला, सर्वातर्फे मी तुमची क्षमा मागतो.'

"अरे, तु कशाला क्षमा मागतोस ? तुझा काय संबंध ? आणि मला भलबुरे म्हणणारे हे काय पाहिलेच आहेत ? अरे त्या मंबाजीने मला मारले, माझ्या वह्या इंद्रायणीत बुडवल्या, दृष्टांनी मला गरम पाण्याने आंघोळ घातली, काय झाले ? शेवटी माझेच शिष्यत्व पत्करले.

अरे, अणु रेणिया थोकडा ! तुका आकाशा एवढा !! ह्या लोकांना उपदेश करुन ही काही फायदा नाही, तुला माहीत आहे ना ?

'रासम धुतला महातीर्था माझी ! नव्हे तैसा तेजी शाम कर्ण !!

तेवी खळा केला काय उपदेश ! नव्हेचि मानस शुध्द त्याचे !!

सर्पासी पाजीले शर्करा पीयुष ! अंतरिचे विष जाऊ नेणे !!

तुका म्हणे श्वाना क्षिरीचे भोजन ! सवेचि वमन जेवितया !!

 

माझे मुळ साहित्य व वाचताच भलभलते उतरे छापतात. अश्या सुशिक्षित पढतमूर्खाना माझे मित्र समर्थ रामदासस्वामी काय म्हणतात माहीत आहे ?

'काय महाराज", मी विचारले

 

'समूळ ग्रंथ पाहिल्याविण'

उगाच ठेवी जे द्रूषण !

गुण सांगता पाहे अवगुण !

तो एक पढत मूर्ख !

 

आम्ही शांतपणे महारज काय म्हणतात ते ऎकत बसून होतो. "या आता तुमची निघण्याची वेळ झाली" असे म्हणत महाराजांनी एक लाडू आमच्या हातावर ठेवला.

'तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू !

नका चरफडू ! घ्यारे तुम्ही !'

 

दुसऱ्याच क्षणी आम्ही पुन्हा आमच्या खोलीत परत आलो. मात्र आमच्या मनात तुकाराम महाराजांची वाक्य रुजी घालत होती.

 

अणुरेणीया थोकडा ! तुका आकाशा एवढा !!

गिळूनी सांडले कलेवर ! भवभ्रमाचा आकार !!

सांडिली त्रिपुटी ! दिप उजळला घटी !!

तुका म्हणे आता ! उरलो उपकारा पुरता !!

News Archive
Feedback

About Us | Disclaimer | Privacy Policy | Contact us