Quick Links

Industries/ Business/ Trade Info

Educate in Jalgaon

Schools in Jalgaon


Welcome Tourist!

Around Web:

Ajanta Caves

Ellora Caves

यत्र-तत्र मराठी लॆखमाला

Jalgaon Shop

City Helplines

Emergency Info

Quick Links

Industries/ Business/ Trade Info

Educate in Jalgaon

Schools in Jalgaon


Welcome Tourist!

Around Web:

Ajanta Caves

Ellora Caves

यत्र-तत्र मराठी लॆखमाला

Jalgaon Shop

City Helplines

Emergency Info

Jalgaon's complete reference - EJalgaon.com

Loading

यत्र-तत्र लेखमालाः

Index


यत्र-तत्र लेखमाला - आमचे चिंतातुर जीवन

लेखक: बिपीनचंद्र नेवे, जळगाव

खरे म्हणजे डोळ्यावर सुर्याने आपली किरणे पसरावीत तोपर्यंत बिनघोर निजावे. कुटुंबाने बंबातील आंघोळीचे पाणी निवून जाईल म्हणोन हालवोन हालवोन उठवावे, तेव्हा कोठे डोळ्यातील नीज अंमळ कमी होवुन किलकिल्या नेत्रांनी कुटुंबाच्या हताश मुद्रेकडे पहात उठावे. गरम गरम वाफाळणाऱ्या चहाच्या कपात पार्लेचे बिस्कुट बुडवून खावे असा आमचा रोजचा शिरस्ता. परंतु आमचे असे सुखी आयुष्य पाहून पोट न दुखावे तर ते आमचे शेजारी कसले.

 

म्हणजे असे कि दररोज कोणी ना कोणी आम्हास काही ना काही चिंता लावतच असतो. आज सकाळीच आमच्या बाजूचे दिगुनाना हडबडत घरात शिरले व घाबरे घुबरे होऊन मला म्हणाले कि मला तुमच्याशी काही खाजगीत बोलायचंय. तुमचा फोन टॅप तर होत नाही ना ? पार्ले चे अर्धे बिस्कुट हातात व अर्धे तोंडात अशा अवस्थेत मी त्यांना विचारले "अहो दिगुनाना बोलताय काय ? आपण काय आता फोनवर बोलतोय का ? फोन टॅप होण्याचा संबंध काय?"

त्यावर नाना म्हणाले "अहो काय धडाधड फोन टॅप होतायत म्हणून सांगू. यातुन तुमची लफडयाची कामे फार. म्हणून म्हटले तुम्हाला आपले सावध करावे. तेव्हडाच शेजारधर्म." असे दिगुनानांनी म्हणाताच आम्ही उरलेले अर्धे बिस्कुट दिगुनानांच्या तोंडात कोंबले.

 

अशा सदोदित निरनिराळ्या चिंता आमचे शेजारी आमचे मित्र यांना पडलेल्या असतात व आता त्या चिंता आमच्या आयुष्याचा भाग होऊन बसलेल्या आहेत. उदाहरणार्थ दातारांच्या सोनालीला पुढचा इंडियन आयडॉल कोण असेल याची सतत चिंता लागून राहीलेली असते. त्यामुळे फावल्या वेळात एसएमएस धाडणे हा सोनालीचा स्वतंत्र उद्योगच असतो. परंतु कितीतरी लोकांना एस एम एस करता येत नसेल. त्यामुळे लोक बरोबर एस एम एस करतात कि नाही असे सारखे मनाला वाटत राहते. खरे म्हणजे सरकारने वीज पाणी रस्ते ई. गोष्टींना प्राधान्य देण्यापेक्षा सर्वांना एस एम एस करण्याचे प्रशिक्षण मिळेल अशी व्यवस्था करायला हवी. म्हणजे मग कोणाचे काही अडणार नाही. परंतु आपल्याकडे अश्या महत्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्षच होते. यावरुन लोकांना ह्या बाबतीत आता स्वावलंबीच व्हावे लगणार असे वाटते. असो.

 

तर एकंदरीत आमच्याकडे असे सतत चिंतातुर वातावरण असते. चिंतुअण्णांच्या प्रसादला केबीसी २ चे काय होईल असे सारखे वाटत असते. अभिषेकला अभिताभचे काम पेलवेल की नाही या चिंतेने त्याला परवा दोन तास काही खाणे पिणे सुचले नाही. गांगुलीला संघात घेतायेत की नाही ह्या चिंतेने सुदीपने डावखोरी बॅटींग सोडली. तर आमच्या गल्लीतील उत्सवमुर्ती जगुदादा. जे की कोणत्याही कार्यक्रमात प्रत्येक फोटोत असायचेच त्यांनी छुप्या क्यामेराची अशी काय धास्ती घेतली की आता कोणालाही भेटायचे म्हणजे ते हेल्मेट घालूनच बोलतात. आता त्यांची काही चुक नाही म्हणा. कारण लोकांनादेखील काय च्यानेलवर काही आले तर मिटक्या मारत बघतात. ह्या छुप्या क्यामेरामुळे खाजगीत काही एक करायची सोय म्हणून राहीली नाही. हल्ली मी भाजीवाली कडून भाजी देखील घेण्याचे टाळतो. काही खाजगी म्हणून करायचे नाही असा मुळी मी नियमच केला आहे. आम्हाला मग खासदाराचे ते पडलेले चेहरे आठवतात. आणी हे छुपे क्यामेरावाले तरी किती निष्ठुर. माणसाची काही तयारी नसतांना गुपचुप फोटो काढायचे म्हणजे काय. आपण कसे फोटो काढतांना भांग वगैरे तीनतीनदा विंचरुन घेतो. पावडर वगैरे नीट लागली आहे का पाहतो. शर्ट वगैरे नीट ईन केला आहे का ते चारचारदा पाहून घेतो. मग फोटोग्राफर आपली मान इकडून तिकडे तिकडून इकडे अशी हलवून हलवून व्यवस्थित बसवतो. मग आपण हासल्याविसल्यावर फोटो निघतो. अस पाहील तर त्या अकरा खासदारांंवर अन्यायच झाला आहे असे मनाला वाटत रहाते. बर च्यानेलवाले तरी काय सर्व स्टिंग ऑपरेशन एडिट करुन दाखवतात. काय काय कापले असेल असा विचार मनाला सतत कुरतडत राहतो. असो.

 

आमच्या समोरील मंदारला मात्र चित्रपटांचे भलतेच वेड. मुख्यत: जे चित्रपट सेन्सॉरने कापून पाठवलेले असतात त्यांची तिकीटे तो हमखास आमच्यासाठी काढुन आणतो. पण तिथेदेखील काय काय कापले असेल हाच विचार राहून राहून मनाला छळत असतो. खरे तर अशा कापलेल्या तुकडयांची सेन्सॉरने एक फिल्म बनवली तर थेटर गर्दीने तुडुंब भरतील व त्या पैशातून एखादे भारतीय ऑस्कर देणे सहज शक्य होईल. मग भारतीय चित्रपटांना एखादे ऑस्कर मिळवणे सोपे होईल. परंतु आपल्याकडे काय सर्जनशील लोकांची उपेक्षाच केली जाते. (हे ही) असो.

 

अशा ह्या निरनिराळ्या चिंतामुळे दिवस कसा निघून जातो ते कळतच नाही. व केव्हा एकदा आपण डाराडुर झोपेच्या स्वाधीन होतो असे वाटत असते. मग ह्यात घरातील गळका नळ दुरुस्त करणे, विजेचे बिल भरणे, संपलेला ग्यास सांगणे इ. कामे राहूनच जातात.

News Archive
Feedback

About Us | Disclaimer | Privacy Policy | Contact us