Quick Links

Industries/ Business/ Trade Info

Educate in Jalgaon

Schools in Jalgaon


Welcome Tourist!

Around Web:

Ajanta Caves

Ellora Caves

यत्र-तत्र मराठी लॆखमाला

Jalgaon Shop

City Helplines

Emergency Info

Quick Links

Industries/ Business/ Trade Info

Educate in Jalgaon

Schools in Jalgaon


Welcome Tourist!

Around Web:

Ajanta Caves

Ellora Caves

यत्र-तत्र मराठी लॆखमाला

Jalgaon Shop

City Helplines

Emergency Info

Jalgaon's complete reference - EJalgaon.com

Loading

यत्र-तत्र लेखमालाः

Index


यत्र-तत्र लेखमाला - येईन अस म्हटल होतस का तू ?

लेखक: बिपीनचंद्र नेवे, जळगाव

येईन अस म्हटल होतस का तू ?

कारण अनासक्त वाटेन
आज पहिल्यांदाच मोडली अपुनर्लम्य शपथ
सोनजर्द पिवळेधम्म फुलांचे झगमगणारे ऋतु अत्तरले
रानभुल व्हायच हे दुसर कारण-
पहिल तू:

कि तू काही म्हटलच नव्हतस?

मग
आस्तेकदम अनाग्रही तलावाला डोंगरभरती का आली?
अन अंतिम काठाने
चुकार बेलगाम वादळांना थोपवल का?
इतस्तत: ?
बरेचदा-
कितीदा?
आता ही खानेसुमारी कोणी करायची?

अलवार पापण्यांचा जांभुळगच्च अदमास घेतांना
चुरगळली गेलीत कित्येक बेहोष पाने-
तुझ्या रुमझुम पावलांच सप्तक अलगुजणाऱ्या वाटेवर-
तांबडफुटी ढगांचा सोनसळ ओरखडा व्रतस्थ नभावर-
-त्या बेदम पानांच आता काय करायच?

मी काही म्हटलच नव्हत-

मग
अनित्य होरपळणाऱ्या असोस ओठांचा वासंतिक सल
कोणी बाळगायचा?
अपरंपार?
मी?
कि तू?

-बिपीनचंद्र

News Archive
Feedback

About Us | Disclaimer | Privacy Policy | Contact us