यत्र-तत्र लेखमालाः
Index
यत्र-तत्र लेखमाला - पॊपट
लेखक:
बिपीनचंद्र नेवे, जळगाव
मी चार दाणे देऊ केले
पाखराला
तर तो म्हणाला
’नंतर बघू’
रोज जळत म्हणून म्हटल
जंगलाजवळ जाऊन
ढाळावे चार अश्रू
तर जंगल पाठ फिरवून बसल
भकाभका सोडत धूर
उघड्या-बोडक्या डोंगराने
ऐकून न ऐकल्यासारखी केली
माझी हाक
मान टाकलेल्या शेतान
मलाच दाखविला
कोयत्याचा धाक
गुढघाभर पाण्यात उभ राहुन
मी जरा पाहील पावसाकडं
टवकारुन
तर पाऊस
इतरत्र शिंपडायला लागला स्वत:ला
मला सोडून
आत्मक्लेश करु म्हटल
तर आत्मा म्हणाला
’माझ मी बघून घेईल,
जरा तु तुझ बघशील तर,
बर होईल!’
-बिपीनचंद्र