यत्र-तत्र लेखमालाः
Index
यत्र-तत्र लेखमाला - एक से एक
लेखक:
बिपीनचंद्र नेवे, जळगाव
एक से एक आहेत इथे घनघोर मेंटल
आणि मी पडलो सीधासाधा गरीब जंटल
(अरे! ही तर उसळलीय दंगल
छे! छे! हे तर पेटलय जंगल)
आग विझवण्याचा हा पोकळ आहे दावा
सुमडीत गेम करण्याचा खरा आहे कावा
तर मग काय? धावा, धावा, धावा, धावा
धावा, धावा, धावा, धावा, सैरावौरा धावा
आडवा येतोय? लोट त्याला
पुढे जातोय? ठोक त्याला
समोर येतोय? उडव त्याला
मिठी मारतोय? बुडव त्याला
कुणी एक बसून राहिला, त्याची नुसतीस टिंगल
एक से एक आहेत इथे घनघोर मेंटल
आणि मी पडलो सीधासाधा गरीब जंटल
(गालावरती खळी होती
नाजुक एक कळी होती)
फुल कुठ करतोस तिला?
झाडावरच तोड तिला
तोड तिला, तिला कुस्कर
नाहीतर मग अस कर
सैतानाची घे आण
दगडावरती तिला हाण
तुझ्या नकट्या वंशासाठी
दगडाचा दिवा आण
कन्या अश्या, कन्या तश्या, म्हणतोस नुस्तीच जिंगल
एक से एक आहेत इथे घनघोर मेंटल
आणि मी पडलो सीधासाधा गरीब जंटल
(विध्वंसाच्या डायरीत नाव आहे नोंदलेल
हातावरती माझ्या, वादळ आहे गोंदलेल)
काय चाललय काय?
काय चाललय काय सध्ध्या?
लांब जीभ काढून
हापसतोय काय गध्ध्या
पैशामागे धावतोस? धाव
बायका पोरांवर कावतोस? काव
हाव,हाव, हाव,हाव, हाव सतत पैशाची
छातीवर काय बांधून नेशील, मोट मोठ्या थैल्यांची?
मी तर इथे मजेत खातोय मिसळपाव सिंगल
एक से एक आहेत इथे घनघोर मेंटल
आणि मी पडलो सीधासाधा गरीब जंटल
-बिपीनचंद्र