यत्र-तत्र लेखमालाः
Index
यत्र-तत्र लेखमाला - दे ना आई
लेखक:
बिपीनचंद्र नेवे, जळगाव
दे ना काही खायला आई
भूक गेलीय लागुन
पोरग चाललय आईचा
पदर ओढत मागुन
आई चाललीय झपाझपा
गेली संध्याकाळ होऊन
पोराचा बोट धरुन
चालतेय त्याला ओढुन
सकाळ पासुन शोधतेय काम
दारोदारी फिरुन
पोटात नाही कण अन
भुकही गेलीय मरुन
बाळा रे, डब्यात आता
कण नाही उरला
कुठुन देऊ तुला आता
काही तरी खायला
बाबा तुझा गेलाय बाहेर
आणील तो काहीतरी
माझ्या हाताने करुन
भरवीन बाळाला भाकरी
पोरग लागतय रडायला
स्फुंदुन, हुंदके देउन
आई देते पाठीमध्ये
एक धपाटा ठेवून
हिरमुसुन, रडुन थकुन
बाळ गेलय झोपुन
आई रडतेय एकसारखी
तोंडात पदर कोंबुन