Loading
| |
|
यत्र-तत्र लेखमालाः यत्र-तत्र लेखमाला - स्टिंग ऑपरेशन लेखक: बिपीनचंद्र नेवे, जळगाव समोरच्या दृश्याकडे आम्ही अनिमिष नेत्रांनी येकटक पाहत राहीलो. (कधी कधी अनिमिष नेत्रांनी समोरच्या दृश्याकडे येकटक पाहत राहील्याने गालावरती बक्षीसी मिळते हे आमच्या काही वाचक मित्रांना ठाऊक असेलच. प्रंतु सांप्रत आम्ही पाहत असलेले हे दृश्य , ते दृश्य नव्हे. उलटपक्षी आम्ही चाणाक्षपणा दाखवून येकटक, अनिमिष नेत्रांनी समोरच्या दृश्याकडे पाहत राहील्याने आपले तंगडे आपल्याच हातात घेऊन घरी परंत ज्याच्या ह्र्द्य प्रसंगातून आम्ही बालबाल बचावलो. कसे ते आम्ही पुढे सांगणारच आहोत.) आमच्या समोर जो देखावा (किंवा मराठीत शीन) उभारला गेला होता दिव्य होता तो एखाद्या गणेश मंडळाच्या देखाव्यापेक्षा ही दिव्य होता (हा 'दिव्य' भव्य 'दिव्य' मधला. दवे का दिव्य मधला नव्हे. हा मसाला खाण्याचे 'दिव्य' तो 'दवे'च करु जाणे.) काय होते आमच्या समोर ? आता वाचकांची उत्सुकता आधिक न ताणता आम्ही सांगूनच टाकतो. आमच्या समोर खोली मध्ये दोन व्यक्ती समोरा समोर खुर्चीवर बसल्या होत्या. हातात मोबाईल घेऊन ते आपसात संभाषण करीत होत्या. आता समोरा समोर बसलेल्या व्यक्ती आपसात मोबाईलवर का बोलत होत्या? आमच्या चाणाक्ष वाचकांना हा प्रश्न पडला असेल. आम्हासही पडला. म्हणजे समोरा समोर बसून देखील मोबाईलवर बोलायच या थराला मोबाईलचे वेड गेल का ? त्या दोन व्यक्तीच भांडण होऊन त्यांनी निव्वळ बोलण न करण्याची शपथ घेतली असेल का ? त्यांच्या मोबाईल बिलांचा खर्च त्यांच ऑफिस भरत असेल का ? असे अनेक प्रश्न आम्ही जात्पाच शंकेखोर असल्याने आमच्या मनात उद्भवले. परंतु आमचा स्वभाव आम्हास ठाऊक असल्याने आम्ही मनाकडे दुर्लक्ष करुन पुन्हा समोरच्या दृश्याकडे लक्ष वळविले. समोरच्या दोन व्यक्तींपैकी एक व्यक्ती म्हराटी भाषा बोलत असून दुसरा व्यक्ती 'बहु भाषा मज प्रिय मराठी असो वा हिंदी गुर्जर बोलु वा कन्नड मज काय कुणाची बंदी' या चालीने कधी कन्नड तर कधी हिंदीत संभाषण करीत होत्या. असो. तर अशा प्रकारे समोरचा चित्रवेधक कार्यक्रम आम्ही बघत असतांनाच येक डास आम्हास विनाकारणच भंडावु लागला. त्याचे पारिपत्य करण्याचा नादात आमचे चित्रविचित्र ध्वनी समोरच्या व्यक्तींना भ्रमणध्वनी संभाषणात सुध्दा ऎकू गेले असावे. पुढे काय घडले? पुढे असे घडले की त्या व्यक्ती आमच्या दिशेने सरकू लागल्या. तेव्हा काय करावे अशा संकटात आम्ही पडलो व मग आम्ही पुतळा बनलो आणी समोरच्या भिंतीकडे येकटक, पापण्या न लववता पाहत राहीलो. इतक्यात त्या दोन व्यक्ती आमच्या दिशेने आल्या व आम्ही जिवंत व्यक्ती आहोत कि पुतळा हे आम्हास चाचपून पाहू लागल्या. येकाने तर आमच्या पार्श्वभागावर चिमटाही काढून पाहील्या. आम्ही कळकळलो परंतु आम्ही हू किं चू ही केले नाही. अखेर आमच्याही धमन्यात म्हराटी रक्त वाहत आहे. काहीही झाले तरी तोंडातून ब्र न काढणे, हू कि चू न करणे हा आमचा बाणा आहे. आणी त्याच बरोबर त्या शूर मराठी सरदारांचा आदर्शही आमच्या समोर होता. रणांगणात पडलेल्या दत्ताजी शिंदेना यवनाने विचारले ' दत्ताजी क्या और लढेंगे' दत्ताजी बाणेदारपणे म्हणाला 'बचेंगे तो और भी लढेंगे'. घोटाळ्यात असण्याचा आरोप झालेल्या एका मराठी सरदाराला पत्रकारांनी विचारले ! सरदार आता काय होईल ?" सरदारांनी बेदरकारपणे प्रतिसवाल केला 'काय होईल?' विचारणाऱ्या पत्रकाराचा आ वासलेला तसाच राहीला. तर हा महाराष्ट्राचा दैदिप्यमान, जाजवल्य इतिहास आमच्या समोर असल्याने आम्ही हू कि चू केले नाही. त्यामुळे आम्ही पुतळा आहोत व त्यातून मराठी माणसाचा पुतळा आहोत. त्यामुळे आम्ही निरुपद्रवी आहोत हे त्या दोन व्यक्तींनी ताडले. व पुन्हा खुर्चीवर स्थानापन होऊन त्यांनी आपल्या कामकाजास सुरुवात केली. त्याच्यात मग जे संभाषण घडले व म्या माझ्या कानांनी जे आईकले ते वाचकां समोर सादर व्यक्ती क्र. १ (आवाज बदलवून सेक्रेटरीच्या ढंगात) "हैलो, दादा को आप से बोलनेका है" व्यक्ती क्र. २ अच्छा व्यक्ती क्र. १ (पुन्हा आवाज बदलवून) "मै दादा बात करता हू ' व्यक्ती क्र. १ - हा बोलो दादा , आज कैसे याद किया' व्यक्ती क्र. २ - वैसे तो रोज जागने के बाद तुम्हारी आठवण आती है. तुम्हारा हल्ली स्टॅम्प का ऑर्डर कमी क्यु आता है? व्यक्ती क्र. १ - वो पुलिस सताती है दादा व्यक्ती क्र. २ - तुम कारण मत दो. वो तुम्हारे भाऊका जमिन का काम हमने किया तो तुमको गोड लगा व्यक्ती क्र. १ - ऎसा नही है दादा, मै कोशिश.... व्यक्ती क्र. २ - क्या कोशिश करते हो तुम? व्यक्ती क्र. १ - भडको मत दादा, थोडा देना पडेगा व्यक्ती क्र. २ - अरे क्या देना पडेगा? कल तक सगळीकडे स्टँम्प पहुचनेको होना. व्यक्ती क्र. १ - बार बार स्टॅंप मत बोलो दादा. सब रिस्की हो गया है. व्यक्ती क्र. २ - अच्छा तो पैड बोलता हु. तू पैड का काम पूरा कर. व्यक्ती क्र. १ - हा दादा. लेकिन पांच पेटी माल होना व्यक्ती क्र. २ - अरे तुमको कल ही तो पांच पेटया पाठवल्या व्यक्ती क्र. १ - और पांच होना दादा व्यक्ती क्र. २ - तुला अजून किती पेटया दयायच्या ? तुझ मढ बशविल मुडदया ...... अश्या प्रकारे संवाद चालू असलेले आम्ही ऎकत होतो. तेव्हा आमच्या लक्षात आले कि तिथे दोन नसून तीन व्यक्ती होत्या. तिसरी व्यक्ती हातात कॅसेट रेकॉर्डर घेऊन रेकॉर्डींग करीत होती. थोडया वेळाने आम्हास संपूर्ण उलगडा झाला. एका व्यक्तीने कुठेतरी मोबाईल लावला व ती म्हणाली 'तुमच्या सांगण्या प्रमाणे सर्व रेकॉर्डींग झालेले आहे. एका तासात कॅसेट तुमच्या कडे पोहचेल' आमच्या सर्व काही ध्यानात आले. तुमच्याही आले असेल.
आम्ही एका स्टिंग ऑपरेशनचे स्टिंग ऑपरेशन केले होते! |
News Archive
Feedback
|
About Us | Disclaimer | Privacy Policy | Contact us |