Quick Links

Industries/ Business/ Trade Info

Educate in Jalgaon

Schools in Jalgaon


Welcome Tourist!

Around Web:

Ajanta Caves

Ellora Caves

यत्र-तत्र मराठी लॆखमाला

Jalgaon Shop

City Helplines

Emergency Info

Quick Links

Industries/ Business/ Trade Info

Educate in Jalgaon

Schools in Jalgaon


Welcome Tourist!

Around Web:

Ajanta Caves

Ellora Caves

यत्र-तत्र मराठी लॆखमाला

Jalgaon Shop

City Helplines

Emergency Info

Jalgaon's complete reference - EJalgaon.com

Loading

यत्र-तत्र लेखमालाः

Index


यत्र-तत्र लेखमाला - अघटित सारे घडले

लेखक: बिपीनचंद्र नेवे, जळगाव

रामराव उठले. म्हणजे रात्री झोपून सकाळी उठले. उठताच त्यांना चहा (गरम) तयार मिळाल. सौ. मालतीबाई त्यांच्या आधीच उठल्या होत्या. एरवी रामराव सकाळी स्वत:च लवकर उठून चहा बनवीत असत. तर आज असे अघटीत घडायला सकाळ पासूनच सूरुवात झाली. दिवसाच्या पोटात यापेक्षाही गुढ घटना दडलेल्या होत्या. कळस पुढेच होता. सौ. मालतीनी रामरावांची क्षमा मागुन आपली सर्व वेगवेगळ्या मार्गाने मिळविलेली बेहिशेबी संपत्ती रामरावांच्या स्वाधीन केली. खिशातील नोटा कमी कशा होतात. वाढीव बिले करुन रक्कम कशी पचविली जाते. इ. सर्व रहस्यांचा उलगडा रामरावांना काळ्या पहाडाप्रमाणे झाला.

आश्चर्यकारक घटनाक्रम असा सुरुच राहीला. (नुकतेच) कॉलेजात जायला लागलेल्या शामलीने, रामरावांच्या सुकन्येने, मकरंद बरोबर वेळी अवेळी न उंडारण्याची शपथ घेतली तर कॉलेजात (सिनीअर) जाणाऱ्या गुण्याने, रामरावांच्या सुपुत्राने प्रांजली, तनया व गौरी या तिघींना (कॉलेजच्या वेळात) न भेटण्याचा दृढ संकल्प बेलभंडारा उचलुन केला. ( गुण्याने कॉलेजच्या एका ऎतिहासीक नाटकात एकस्ट्रा मावळ्याचा पार्ट केला होता.)

मग दिवसभर असा अनाकलनीय घटनाक्रम सुरुच राहीला. रामराव हापिसात गेले तर नुकतीच लागलेली (फटाका) सोनाली मल्होत्रा अंगभर कपडे घालून आलेली होती. त्यामुळे बॉसचा मुड खराब झाला. सुधाकर जोशीने पुरुष मित्रांसोबत डबा खाल्ला. बायकांनी आपापले नवरे, सासु, नणंदा व कोणाकोणाचे लफडे, साडया व दागीने या विषयी चर्चा न करता ऑफिसच्या कामात कशी सुधारणा होईल य संबंधी गंभीर चर्चा केली. त्यामुळे बॉसचा मुड थोडा बरा झाला.

अशा आश्चर्यकारक घटना मग देशभरत घडू लागल्या. ब्रेकिंग न्युज साठी तडफडणाऱ्या सर्व च्यानेलसची त्यामुळे चंगळ झाली. त्यामुळे त्यांनी एस एम एस आधारीत सर्व स्पर्धा बंद केल्याचे जाहीर केले. सर्व मोबाईल कंपन्यांनी यापूर्वी एस एम एस मध्ये कमाविलेला पैसा पंतप्रधान सहायता निधीत दान करीत असल्याचे जाहीर केले. विलासराव देशमुखांनी प्रत्येक अतिवृष्टीच्या भागात उंचाले टॉवर्स बांधण्याचे जाहीर केले. जेणे करुन अतिवृष्टीच्या काळात त्यांना त्यावरुन परिस्थितीवर लक्ष ठेवता येणार होते. मुंबईत टॉवर बांधण्यासाठी लागणारी मोक्याची जागा शिवसेनेने देण्याची तयारी दाखविली. कमी पैशात उत्कृष्ट बांधकामाची हमी देण्याच्या कंपनीला कंत्राट देण्यात आले. प्रभाराव व मार्गारेट अलवा यांनी राजकारण संन्यासाची घोषणा करुन विलासरावांना दिलासा दिला. तर सोनिया गांधीनी मनमोहन सिंग यांना पंतप्रधानपदाचे सर्व अधिकार बहाल करुन यापुढे ते स्वतंत्ररित्या काम करतील असे जाहीर केले. तर आदय चाणक्य नटवर सिंग यांनी व्होल्करची अन्नान दशा करेपर्यंत शेंडीला तेल न लावण्याची प्रतिज्ञा केली. तेव्हा कोफी अन्नान यांनी मध्यस्थी करुन हे प्रकरण मिटविले.

इकडे जागतिक पातळीच्या मिस वर्ल्ड, मिस युनिव्हर्स या स्पर्धे सोबतच मिस बारबाला ही नवीन स्पर्धा घोषित करण्यात आली. जगातील सर्व बारबालांनी यात सहभाग घेतला तेव्हा भारताची मिस तरन्नुम ही ह्या स्पर्धेची प्रथम विजेती ठरली. विजेते पदाचा मुकूट महाराष्ट्र राज्याचे बारग्रस्त (प्रिंटींग मिष्टेक ! हा शब्द भारदस्त असा वाचावा) उपमुख्यमंत्री व गृहमंत्री श्रीयुत आराराबा. यांनी स्वहस्ताने मिस तरन्नुम हिला चढविला. या प्रसंगी देश विदेशातील सर्व प्रमुख क्रिकेट खेळाडू जातीने हजर होते. श्रीलंकेचा मुरलीधरन नामक क्रिकेटपटु मात्र सहकुटूंब हजर होता. मुरलीधरनचा 'दुसरा' कळल्याने त्याच्या पत्नीने त्याला क्षणभरही डोळ्यासमोरुन हलू दिले नाही. विजेतेपदाचा मुकुट आराराबांच्या हस्ते स्विकारतांना तरन्नुमला अश्रू आवरले नाही. ती आरआबांच्या खांदयावर डोके ठेऊन अश्रू गाळणार हे लक्षात येताच 'ताई तुम्ही जरा दूर उभे रहा' असे म्हणून आराराबा जे सटकले ते सटकलेच.

हलकल्लोळ तर पुढेच माजला. एका कॉलेज मधील सर्व विद्यार्थ्यांनी व प्राध्यापकांनी व्यसन मुक्तीची शपथ घेतली व शंभर टक्के व्यसन मुक्ती झाल्याचे जाहीर केले. सर्व पक्षातील प्रमुख नेत्यांनी आपापली खरी संपत्ती जाहीर करण्यास सुरुवात केली. त्यामुळे सीबीआय व इन्कमटॅक्स खात्याचे अधिकारी हवालदिल झाले. कारण त्यांना ती छापे घालुन उघडकीस आणायची होती. नेत्यांच्या ह्या सत्यभाषणामुळे त्या त्या पक्षांचे श्रेष्ठी अडचणीत आले. प्रत्येक श्रेष्ठीचे गुरु हे महापॉवरफुल होते. देवांशी त्यांचा थेट संपर्क असे. परंतु त्या दिवशी आक्रितच घडले. सर्व महापॉवरबाज गुरु हे मौनव्रत स्विकारुन चरख्यावर सुत काढायला बसले.

च्यानेलवाल्यांनी हि ब्रेकींग न्युज आहे हे लगेच कळले व त्यांनी आपल्या सर्व तेज महातेज वार्ताहरांनी ही भानगड शोधण्यावा शोध कार्यावर पाठविले. यापैकी एक सबसे तेज वाहिनीच्या तेज तरुणीने एका गुरुला बोलते केले व तिने जी ब्रेकिंग न्युज आणली ती अशी 'सांप्रतच्या काळात देवांशी संपर्क ठेवणारे बाबा महाराज' गुरु उदंड झाले होते. सर्वांना प्रश्नांची उत्तरे देऊन देऊन देव कंटाळले व त्यांनी सर्वांशी संपर्क तोडायचे ठरवून पृथ्वीतलावर फक्त एकाशीच संपर्क ठेवण्याचे ठरवीले. त्या अगोदर त्यांनी सर्वांची फिरकी घ्यायचे ठरविले व चुटकी सरशी सर्व अघटीत ते घडायला सुरुवात झाली. देवाने संपर्क ठेवण्यासाठी ज्या एकमेव व्यक्तीची निवड केली होती ती व्यक्ती म्हणजे पृथ्वीसम्राट श्रीश्रीश्री १००८ प्रंपिता महामंडलेश्वर पिठाधीश स्वामी जॉर्ज बुश (ज्युनिअर)

News Archive
Feedback

About Us | Disclaimer | Privacy Policy | Contact us