Marathi Article Series Feedback
Name:*  
E-mail:*
 
Message:*
 
 
दोषी...
 
 
(लेखक: बिपीनचंद्र नेवे, जळगाव)
 
 

 उधळीत यौवन, मंचावर अवतरली मत्त प्रमदा

गात्रात उफाळे मदन, नेत्रात वारूणी, मादक अदा

मदमस्त रोखुनी कटाक्ष, झोकात ही चालते

हाय, काळजात हळुवार, ही मदनमंजीरी शिरते !! १ !!

 

लेवुनी साज, मौक्तिक, रत्न आभुषणे

सोनसळी कायेवर, रेशीम वस्त्र प्रावरणे

मुक्त व्हावया पाहे, यौवनाभार, जो जो आवरता

शिणली ही नाजूक तनु, वस्त्राभार सावरता !! २ !!

 

अन अदभुत ते घडले, पाहुनी निवली नयने

त्यागुन तनुला, गळली ती चावट वसने

उघडी क्षणभर, बिलोरी आरसापानी काया

शतजन्मीची लागती पुण्ये, ऎसे दर्शन व्हाया !! ३ !!

 

खडबडुनी जाहले जागी, सुस्त सरकार

फर्माने सुटली, हुडकाया गोड गुन्हेगार

कोणाकडुन जाहली ही नयनमधुर चूक?

चौकशीत पातला दोषी (बिचारा) कंचुकीचा हूक !! ४ !!

 
 


बिपीनचंद्र नेवे,
जळगाव

 

 


Yatra Tatra Series Home Page | EJalgaon.com Homepage