|
|
मधुमेहाची तोंड ओळख आणि आधुनिक वैद्यकीय दृष्टीकोण |
|
||||||||||||||||||||
|
|
(डॉ.
प्रसन्नकुमार, प्रमोदकुमार
रेदासनी) |
|
||||||||||||||||||||
|
|
प्रास्ताविक: सहज सोप्या शब्दात मधुमेह म्हणजे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढणे. मधुमेह म्हणजे वैद्यकीय परिभाषेत 'डायबेटिस मेलिटस'. डायबेटिस या ग्रीक शब्दाचा अर्थ आहे 'मार्गे जाणे' आणि मेलिटस शब्दचा अर्थ आहे साखर. मधुमेहाचे तंतोतंत वर्णन असे की तुमच्या शरीरातून साखररुपी द्रव्यपदार्थ बाहेर टाकला जात आहे. लोकसंख्येच्या बाबतीत आघडीवर असलेला माझा भारत देश थोड्या वर्षाच्या कालावधीत मधुमेहाचे सर्वाधिक रुग्ण असलेला मधुमेहींचा 'मधाळ' गोड देश म्हणून मान्यता पावलेला आहे. खरं म्हणजे १०/१५ वर्षापुर्वी 'डायबेटीस' हा श्रीमतांचा आजार समजला जायचां. हळूहळू मधुमेहाने गरीब, श्रीमंत असा भेदभाव ठेवलांच नाही. सधारणत: शहरी भागात ५ ते १० टक्के, ग्रामीण भागात २ ते ३ टक्के असे प्रमाण आढळून येते. थोडक्यात, मधुमेहला सर्वव्यापी, सर्वसमावेशक असे स्वरुप प्राप्त झाले, वयाचंही बंधन राहीलं नाही. मधुमेहाची ह्रदयविकाराशी असलेली घनिष्ठ मैत्री प्रकृतीला फारच घातक ठरत आहे.
लक्षणं: जास्त भुक लागणे, जास्त तहान लागणे, वारंवार लघवीला जाणे, थकवा जाणवणे, वजनातील बदल, हातापायाला मुंग्या येणे, यापैकी एक किंवा अधिक लक्षणं लक्षात आली की, मधुमेहाची शक्यता लक्षात घेवून रक्तातील साखरेचे प्रमाण तपासणे आवश्यक ठरते.
कारणे: अनुवंशिकता, जन्मत: स्वादुपिंड नसणे, धकाधकीच्या स्पर्धात्मक जगातील मानसिक ताणतणाव, अनियमीतपणा, धावपळ, वाजवीपेक्षा जास्त वजन व व्यायामाचा अभाव.
निदान: सामान्यत: उपाशीपोटी रक्तातील साखरेचे प्रमाण ११० मि.ग्रॅ.% पेक्षा जास्त असेल, जेवणानंतर दीड ते दोन तासांनी रक्तातील साखरेचे प्रमाण १४० मि.ग्रॅ.% पेक्षा अधिक असेल, तर मधुमेहाचे रुग्ण आपण झालात, यावर शिक्कामोर्तब झाला अस समजायचं. म्हणजे दिवसाच्या २४ तासातील कोणत्याही वेळेस घेतलेले साखरेचं प्रमाण १३० मि.ग्रॅ.% पेक्षा जास्त असेल, तर अशा व्यक्तींचे उपाशीपोटी व जेवणानंतर दोन तासांनी घेतलेल्या रक्तातील साखरेचे प्रमाण तपासल्यानंतरच मधुमेहाचे पक्के निदान करता येते. बऱ्याच व्यक्तींच्या मनात उपाशी पोटी व जेवणानंतर रक्तातील साखरेचे प्रमाण व्यवस्थित असले तरी मधुमेह होण्याची शक्यता आहे का? असा प्रश्न भेडसावत असतो. अशा प्रसंगी "ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट" ही चाचणी केली असता समाधानकारक उत्तर मिळू शकते. फिजिशियनच्या सल्ल्यानुसार उपाशी पोटी व अर्ध्या तासाच्या फरकाने किंवा तासा तासाच्या अंतराने रक्त व लघवीतील साखरेचे प्रमाण तपासले जाते. साधारणत: उपाशी पोटी रक्त घेतल्यानंतर १ मि.ग्रॅ/किलो या प्रमाणे ग्लुकोज दिले जाते. काही वेळा स्त्री गरोदर असतांना किंवा दारुचे व्यसन असलेल्या व्यक्तींच्या रक्तातील सखरेचे प्रमाण व्यवस्थित असतांना लघवीवाटे साखर बाहेर पडत असते. याला "रीनल ग्लायको सुरीया" असे म्हणतात. भविष्यात अशा व्यक्तींना मधुमेह होण्याची शक्यता असते. मधुमेह हमखास होईलच असे नाही. क्वचीत प्रसंगी उपाशी पोटी रक्तातील साखरेचे प्रमाण वाढलेले असतांना जेवणानंतर रक्तातील साखरेचे प्रमाण व्यवस्थित असते. अशा वेळेस पॅथॉलॉजिस्टनी रक्तातील साखरेच्या प्रमाणाची खात्री करुन घ्यावी व रिपोर्टमध्ये तडजोड करु नये कारण अश्या व्यक्तींना भविष्यात मधुमेह होण्याची बरीच शक्यता असते असे वैद्यकीय शास्त्रज्ञांच्या लक्षात आले आहे.
नियंत्रण: बऱ्याच वेळी मधुमेहाचे निदान झाल्यावर रुग्ण हताश होतात. आयुष्यात आता राम राहीला नाही, गोडवा राहिला नाही, 'मिठा नही खाना याने अब जीवन मे क्या रहा?' असे 'माझे जीवन खाणे' अशा संस्कृतीतील मंडळींना मी सांगू इच्छितो की, तुम्ही सुध्दा सामान्य माणसाप्रमाणे जीवन जगू शकता. बहुतांशी वैद्यकीय उपचारांच यश रुग्णांच्या सहकार्यावर अवलंबून असते. अर्थात उपचार करणारी वैद्यकीय मंडळी निष्णात हवीच. मधुमेहाची सुरुवात असेल तर योग्य आहार व पुरेसा व्यायामाच्या मदतीने औषधीविना रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रीत करता येते. या उपरांत मधुमेहाचे प्रमाण जास्त असेल तर औषधी, गरज भासल्यास इन्सुलिनने साखरेचे प्रमाण नियंत्रीत करता येते. वेळेवर जेवण, वेळेवर औषधी, नियमितपणे रक्ताची तपासणी, ही पथ्ये पाळणे आवश्यक आहे.
गैरसमज: १) बरेच रुग्ण आम्ही गोड पदार्थ खात नाही किंवा मिठाईचे कमी प्रमाणात सेवन करतो तरी मधुमेह का झाला? अशी विचारणा करतात. मित्रहो, एक बाब मी स्पष्ट करु इच्छितो की, गोड पदार्थ खाल्याने मधुमेह होत नाही, पण मधुमेह झाल्यानंतर गोड पदार्थ वर्ज्य करावे किंवा शक्यच नसेल तर कमी प्रमाणात घ्यावे. २) एकदा मधुमेहाचे निदान झाल्यानंतर साखरेचे प्रमाण नियंत्रीत करणे शक्य आहे. पण त्याचे समुळ उच्चाटन होत नाही असा आजपर्यंतचा सर्वसामान्य अनुभव आहे. परंतु भोंदुगिरीला बळी पडून काही मंडळी मधुमेह बरा करण्याचे आश्वासन देवून पैसे उकळण्याचा प्रयत्न करतात. मानवजातीला नाविन्याचे, अनपेक्षीत चमत्काराचे आकर्षण असतेच, भुलथापांना बळी पडण्याचा त्यांचा स्वभाव आहे. तरी अशा फसव्या आश्वसनांना बळी पडू नये. मधुमेहाचे संपूर्ण उच्चाटन करण्याऱ्या व्यक्तीला 'नोबेल प्राईज' मिळू शकते. अशा भोंदूगिरी करणाऱ्या व्यक्तींनी गरीब जनतेची फसवणूक करु नये, अन्यथा वैद्यकीय कायद्यानुसार संबंधीतांना गजाआड करता येते हे लक्षात घ्यावे. या करिता शासकीय वैद्यकीय अधिकारी, सिव्हील सर्जन, आरोग्य खात्याची महत्वपूर्ण बहुमुल्य मदत मिळू शकते.
सावधगिरी: १) काही वेळा मधुमेहाच्या औषधोपचाराच्या दरम्यान रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होवू शकते. जास्त प्रमाण औषधी किंवा औषधी घेतल्यानंतर नेहमीपेक्षा कमी जेवण किंवा जेवणाला उशिर, अतिकष्टाचे काम, धावपळ, आजार, ही कारणे आहेत. तरी जेव्हा जेव्हा अधाश्यासारखी भुक लागणे, दरदरुन घाम फुटणे, थरकाप होणे, अशक्तपणा जाणवणे, डोकं दुखणे, बोटांमध्ये आणि ओठांमध्ये झिणझीण्या येणे, ह्रदयाची धडधड जाणवणे, अशी लक्षणे आढळल्यास लगेच ग्लुकोज किंवा मिठाई सेवन करावे. म्हणून प्रत्येक मधुमेही व्यक्तींचे स्वत:च्या खिशात ४०/५० ग्रॅम साखरेची पुडी ठेवणे आवश्यक आहे. साखरेचे प्रमाण कमी झाल्यास शुध्द हरविण्याची शक्यता असते. थोडा बेसावधपणा लाख मोलाचे जिव गमविण्यास कारणीभुत ठरु शकतो. २) शक्यतो रुग्णाची जिथे श्रध्दा असेल त्या पॅथॉलॉजिस्टकडे नियमितपणे रक्त व लघवीतील साखरेचे प्रमाण तपासून घ्यावे. फॅमेली पॅथॉलॉजिस्ट ही संकल्पना लयास गेलेल्या फॅमिली फिजिशयन प्रमाणेच तुमच्या आरोग्याबाबत महत्वपूर्ण भूमिका बजावू शकतात. उपचार व निदान करणाऱ्या पॅथॉलॉजिस्टवर विश्वास दर्शविल्यास तो अधिक काळजीपूर्वक तपासणी करतो. मानवीय चुका अपरिहार्य असतातच. आमचं चुकतच नाही ही गुर्मीची भावना, डॉक्टर मंडळींनी बाळगू नये. रुग्णाला शंका असल्यास खेळाडू वृत्ती ठेवून रक्त व लघवीतील साखरेच्या प्रमाणात फेर तपासणी विनामुल्य करुन डॉक्टर व रुग्ण यासंबंधातील विश्वसार्हता वृध्दिगंत करणे आवश्यक आहे.
मधुमेह नियंत्रणाची आवश्यकता कां ? दीर्घकालीन
मधुमेहाच्या आजारामुळे शरिरावर
होणारे दुष्परिणाम टाळण्याकरीता
रक्तातील साखरेच्या प्रमाणाचे
योग्य नियमन करणे आवश्यक आहे.
हातापायांना मुंग्या येणे,
मज्जासंस्थेवर होणारा परिणाम
Neuropathy नेत्रपटलावर होणारा दुष्परिणाम
Retinopathy मुत्रपिंडावर होणारा
दुष्परिणाम Nephropathy शरिरातील
सुक्ष्म रक्तवाहीन्यांवर
होणारा दुष्परिणाम Angiopathyव ह्रदयरोग
टाळाता येतो. तसेच महत्वाची
शस्त्रक्रिया यशस्वी करण्याकरीता
साखरेचे प्रमाण नियंत्रित
करणे आवश्यकच आहे. अन्यथा शस्त्रक्रिया
उपकारक ठरण्याऎवजी अपकारक
ठरण्याची शक्यता असते. आधुनिक शास्त्रीय दृष्टीकोन: सध्या मधुमेह
तज्ञ उपचारा आधी व नंतर वेळोवेळी
ग्लायकेटेड किंवा ग्लायकोसिलेटेड
हिमोग्लोबीन (HBA1C) या चाचणीची
शिफारस करतात. ही चाचणी महागडी
पण प्रभावी आहे. मधुमेही रुग्णांकरीता
अनोखी भेट आहे. सामान्यत: उपाशीपोटी
व जेवणानंतर दोन तासांनी रक्तातील
प्रमाण तपासले जाते, पण तसं
बघितले तर हे सुध्दा पुरेसे
नाही. रक्तातील साखरेचे प्रमाण
तासातासाला, मिनीटामिनीटाला,
क्षणोक्षणी बदलत असतं. दैनंदिन
जीवनक्रमात बदल झाला की, प्रमाण
बदलते. व्यायामाच्या आधी, नंतर,
प्रवास करतांना आजारपणाच्या
काळात, मानसिक ताणतणाव, धावपळ
असेल तर अशा प्रत्येक प्रसंगी
रक्ताच्या साखरेत होणारे बदल
तपासून बघणे अशक्य आहे. सर्वसाधारणपणे
साखरेचे योग्य नियमन होत आहे
किंवा नाही हे कळण्याचं माध्यम
म्हणजे (HBA1C) ही चाचणी. या चाचणीद्वारे
मागील तीन महिन्यातील रक्त
शर्करेच्या सरासरी प्रमाणेच
महत्वपूर्ण निदान होवू शकते.
HBA1C : रक्तातील तांबडया
पेशीतील प्रथिनांशी संलग्न साखरेचे प्रमाण
म्हणजे ग्लायको सिलेटेड हिमोग्लोबीन
साधारणत: तांबडया पेशींचे आयुष्य १०० दिवसांच्या आसपास असते. म्हणूनच HBA1C
चाचणीद्वारे
मागील तिन महिन्यातील
रक्त
शर्करेच्या सरासरी प्रमाणाचे निदान शक्य होते.
HBA1C चे प्रमाण HPCL (High
Performance Liquid Chromatography) व Boronate
Affinity Chromatography या पध्दतीद्वारे योग्य प्रकार केले जाते. सध्या बोरोनेट ऑफिनिटी क्रोमॅटोग्राफी या तत्वाचा वापर करुन HBA1C
चे
प्रमाणाचे निदान करणारे मशीन उपलब्ध आहे. नॅशनॅल ग्लायको हिमोग्लोबीन स्टॅर्डडरायझेशन रेफरन्स लॅबोरेटरीने GDX Analyser या उपकरणाला समर्पक योग्यतेचे प्रमाणपत्र बहल केले आहे. HBA1C ची अवश्यकता: १) मधुमेहाच्या
प्रत्येक रुग्णाला या
चाचणीद्वारे हमखास फायदा होतो. मधुमेह
तज्ञांना उपचाराचे योग्य शास्त्रीय
व्यवस्थापन शक्य झाले आहे. रक्तशर्करेचे
सरासरी प्रमाण नियंत्रीत झाले तर
मधुमेहाच्या दिर्घमुदतीनंतर होणारे
दुष्परिणाम टाळता येणे शक्य आहे. मधुमेही
नियंत्रण व दुष्परिणामाच्या
वेगवेगळ्या चाचण्या अमेरीकन
शासनाच्या आर्थिक सहकार्याच्या मदतीने
राबविल्यानंतर पूर्ण विचारांअती
अमेरीकन डायबेटीस असोसिएशनने अशी शिफारस
केली आहे की, * इश्युलिन घेणाऱ्या पेशंटची वर्षातून HBA1C ही चाचणी ३/४ वेळा करणे आवश्यक आहे. अर्थात रुग्णांमध्ये उपचारात
बदल करावयाचा असेल किंवा
रक्त शर्करेचे प्रमाण वाढलेले असेल
तर मधुमेह तज्ञांच्या
सल्यानुसार
ही चाचणी केली जाते. * जे पेशंट इश्युलियन वापर न करता गोळ्यांच्या माध्यमाने साखरेचे प्रमाण नियंत्रित करतात त्यांना कमीत कमीत वर्षातून दोन वेळेस ही चाचणी करावी. * HBA1C चे प्रमाण ७% पेक्षा कमी असेल तर उत्तम नियत्रंण आणि जर का ८% पेक्षा जास्त असेल तर औषधोपचाराच्या
व्यवस्थापणाचे पुर्नमूल्यांकन होणे
आवश्यक आहे. २) मधुमेहांच्या रुग्णांवर महत्वाची गुंतागुंतीची शस्त्रक्रिया
करायची असेल तर
शस्त्रक्रियेच्या ८/१० दिवसा आधीपासून मधुमेही नियमितपणे औषधोपचार घेवून आता रक्तातीळ साखरेचे प्रमाण व्यवस्थीत आहे असे सिध्द करुन शल्य विशारदाची व स्वत:ची फसवणूक करतात. योग्य शस्त्रक्रियेनंतर सूध्दा रुग्ण अपेक्षेप्रमाणे बरा होत नाही याचे कारण असे की, ८/१० दिवसांचा कालवधी वगळता भुतकाळातील बराच काळ
रक्तशर्करेचे योग्य नियमन झाले
नसण्याची शक्यता असते. म्हणूनच यशस्वी
शस्त्रक्रियेकरीता HBA1C ही चाचणी मागील १०० ते १२० दिवसातील रक्तातील साखरेचे सरासरी
प्रमाण दर्शवून महत्वाची
भूमीका बजाविते. ३) अनेक वेळा अचानक गंभीर स्वरुपचे आजार उदभवल्यानंतर रक्तातील
साखरेचे प्रमाण वाढल्याचे
निदर्शनास येते. तेव्हा या रुग्णाला
खरोखरच मधुमेह आहे किंवा नाही किंवा Stress Induced Hyperglycemia अचानक उदभवलेल्या आजारांमुळे
रक्तातील साखरेचे प्रमाण वाढले
आहे कां? हे निश्चीत स्वरुपात ठरवीण्याकरीता HBA1C
ही चाचणी
गंभीर रुग्णांच्या योग्य
उपचाराकरीता
ठरते.
|
|
||||||||||||||||||||
|
|
डॉ. प्रसन्नकुमार रेदासनी (जैन) |
|