|
|
'शोध' - 'बोध' |
|
|
|
(डॉ.
प्रसन्नकुमार, प्रमोदकुमार
रेदासनी) |
|
|
|
दि. ३ फ्रेबुवारी मंगळवारी रोजी एका दैनिकच्या शेवटच्या पानावर 'राज्यस्तरीय खेळाडुंचा सत्कार' या शिर्षकाखाली रुपाली गायकवाडचाफोटो झळकला. चेहरा ओळखीचा वाटला, थोडं आठवण्याचा प्रयत्न केला. परवाच धाकटया रुपालीला थोरली बहीण दिपाली सोबत माझ्या वहिनींच्या काकांकडेधुणी भांडी करतांना बघितल्याचं आठवलं. उत्सुकतेपाटी काकांजीनाफोन लावला. त्यांनी विस्मयचकीत करणारी अविश्वसनीय माहिती दिली. दिपाली व रुपाली सख्या बहीणी! दिपाली सहा वर्षाची असतांना जन्मदाती आई दोघी मुलींना वाऱ्यावर सोडून नविन संसार थाटण्यासाठी घर सोडून गेली ती कायमचीच! बापानेही दुसर लग्न केले. दिपाली आठवीत व रुपाली सहावीतशिकत असतांना सावत्र आईसुध्दा घर सोडुन परत तिच्या माहेरी गेली. यावर कळस म्हणजे त्याचवेळेस राहिलेलाएकमेव आधार वडीलसुध्दा कल्पना न देता कोवळ्या मुलींना वाऱ्यावर सोडून जबाबदारी झुगारुन मुंबईलानिघून गेले. अगदी घरमालकालासुध्दान सांगता ! आज, उद्या पितृछत्र परतमिळेल या आशेने दोघं मुलींनी वाटबघितली. बाप परत येण्याचं चिन्हदिसेना. "आभाळ फाटलं म्हणतात तेकदाचीत हेचं असावं". चिमणीसुध्दातिच्या पिलांना इवल्याशा पंखातउडण्याचे बळ येईपर्यंत घास भरवितअसते. हा जन्मसिध्द अधिकार अथवामुलभुत गरज म्हणा या सर्व बाबतीतदिपाली-रुपाली या पाखरांना मायेपासून वंचीत राहावं लागलं ही खरी शोकांतिकाआहे. लाडे-लाडे रुसण्याचं खेळण्या बागडण्याचं वय. याच वयात नियतीच अशी रुसुन बसली, तर या चिमुरडयांनी लाडे-लाडे कुणावर रुसायचं? त्यांच्या रुसवा फुगण्याचं कोड कौतुक कुणी करायचं? परवा आमचेमित्र दंगल गुरुजींशी याविषयावर बोलतांना थोडी खंत व्यक्त केली असतात्यांनी 'अमरवेल' विषयी वैशिष्टपूर्णमाहिती दिली. अमरवेलीला स्वत:ची अशी वेगळी जमीन, पाणी लागत नाही. अमरवेलीची एक फांदी संपुर्ण वृक्ष आच्छादीतकरण्याची क्षमता बाळगुन असते. दोन्ही बहीणींनी जिवाचा आकांत न करता, आक्रोश करत बसण्यापेक्षा आसमंत व्यापुन टाकण्याची आकांक्षा बाळगत दुर्दैवालावाकोल्या दाखवत परिस्थितीशी सामनाकरण्यास पदर खोचला. जीवन प्रवासातचढ-उतार येणारच, ऊन-पाऊसाचा खेळ हाचालु राहणारच. घर मालकाने पाठीवर हात ठेवला. आजु बाजुच्या कुटूंबवत्सल मंडळींनी धुणी-भांडी करण्याच काम दिल. मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा । पाठीवरती हात ठेवुन नुसतं लढ म्हणा ... ॥
प्रतिभावंताच्या कवितेच्या याओळी अक्षरश: प्रत्यक्षात साकार झाल्या. वाजवी खोली भाडं व दोन वेळेच्याजेवणाचा प्रश्न सुटला. फक्त पोटभरण्याकरीता जगणं या कतृत्ववान चिमुरडयांच्या पचनी पडणारं नव्हत. पोटाची खळगी भरण्यासाठी लागणाऱ्यावेळेतुन उरलेल्या एक-एक क्षणाचाचीज करण्याचा चंग बांधला. शाळा, अभ्यासव लहान मुलांच्या शिकवण्याकरीतावेळेचे योग्य नियोजन केले. अगदी प्रौढ माणसांप्रमाणेच । तसं या मुलींचं बालपण क्रुर नियतीच्याप्रवाहात कधीच हरवुन गेल होतं. रुपाली-दिपालीचं शाळेत जाणे, अभ्यास करणे, टयुशन घेणे, परिपक्व मोठया माणसाप्रमाणे वागणं, बोलणं, सभोवताली चर्चेचा व कौतुकाचाविषय झाला. कालचक्राला कोण रोखु शकतो ? बघता-बघता तीन वर्षाचा काळ निघून गेला. "अहो आश्चर्यम । अमरवेलबहरली". दिपालीला एस.एस.सी. च्यापरिक्षेत ७७% गुण मिळाले. तिच्यां व्यक्तीमत्वाचा, कर्तृत्वाचा ठसाउमटला. दिपालीच्या भावविश्वातीलअंध:कार दूर होवुन लख्ख प्रकाश झाला. तत्व चिन्तक असे म्हणतात, या जगातअशक्य:प्राय असे कहीच नाही. जीवनाच्यासमरांगणात एकाकी लढत देणाऱ्या दिपाली-रुपालीनेहे तत्वज्ञान सत्य आहे, याची प्रचीती दिली. दृढ संकल्पाला अविरत प्रयत्नांची साथ हवी, मग यश तुमच्या पायाशी लोटांगणघेणारचं. किमान काळाजी घेणारे आई वडील व थोडसं आर्थिक पाठबळ मिळालं असतं तर दिपाली मेरीटमध्ये नक्कीच झळकली असती. दिपाली-रुपाली वयाच्या मुलां-मुलींनी स्वत:ला भाग्यवान समजावं. त्यांची काळजी घेणारे माता-पिता लाभले आहेत. दुर्दैवाने ही जाणीव बोटावर मोजण्याइतक्या पाल्यांना असते. आई बाबांच्याकष्टाचं, त्यागाचं चीज करावं असामोलाचा संदेश द्यावासा वाटतो. विपरीतपरिस्थितीशी कस जुळवुन घ्याव याच मार्गदर्शन दिपाली-रुपाली कडून घ्यावं. हिरव्यागार कुरणावर बागडणाऱ्यातुमच्या आमच्या बछडयांची भेट घडवुन आणा दिपाली-रुपालीशी। त्यांच आयुष्य उजळुन निघेल. आमचे लाडके राष्ट्रपती अब्दुल कलाम म्हणतात '२०२० सालापर्यंतहिंदूस्थान महासत्ता बलशाली राष्ट्र होणारच'. माझी भारत माता दिपाली-रुपाली, उत्तर धृव गाठुन दक्षिण धृवापर्यंतभरारी घेणारी आसोद्याची शितल महाजन; भारताचं नाव अजरामर करणारी अंतराळवीर स्व. कु. कल्पना चावला अशा अनेक रत्नांची खाण आहे. उद्याचा दिवस आमुचा आहे. आवश्यकता आहे फक्त या रत्नांना योग्य पैलु पडण्यासाठी थोडयाशा मदतीच्याआधाराची. दिपालीचे दहावीच्या परिक्षेतीलदैदीप्यमान यश, आठवीत शिकणाऱ्यारुपालीची राज्यस्तरीय खेळाडू म्हणून छाप अस यश पाहून एका प्रचलीत शेरचाउल्लेख करावासा वाटतो. "नशिमन पे नशिमन इस कदर बढता जा । बिजली गिरते गिरते बेजार हो जाये ॥" एकामागुन एक यशोशिखरें पादाक्रांतकरत जा. अडी अडचणी येणारच, साक्षातपरमेश्वराला तुला मदतीचा हात द्यावाच लागेल. सरतेशेवटी दिपालीची मुलाखत संपवतांनाप्रश्न केला; लहानपणीच सोडून जाणारी जन्मदात्री आई, सावत्र आई व वडीलया तिन्ही व्यक्तींवर तुला संताप येतो का ? दिपाली क्षणाचाही विलंबन करता पुटपुटली, 'माझा कुणावरही राग नाही, जन्मदात्या आईने जन्म दिला त्यामुळेच हे सुंदर जग मी बघु शकले हे तिचे उपकारच आहे, सावत्र आईने आमचा सात वर्ष कसा का होईनासांभाळ केला ही बाब विचारात घ्यावीच लागेल. माझे बाबा आम्हाला सोडून गेले, त्यांची काहीतरी मजबुरी असेलअशी आमची मनोमन खात्री आहे. आई बाबाथोर तुझे उपकार।' आमच्या युवा पिढीनेत्यांच्या करीता अहोरात्र झटणाऱ्यापालकांविषयी कर्तव्यभावनेचा धर्म कसा पाळावा यावर विचार मंथन करण्याची वेळ येवुन ठेपली आहे. शेवटचा प्रश्न दिपालिला विचारला: तुझं भविष्य उज्वल आहे. तु उद्याची स्टार आहे. मोठी झाल्यावर तू काय करणार? ती म्हणाली: जन्मदात्या आईची, थोडंफार संगोपन करणाऱ्या सावत्र आईची व 'माझामोठा मुलगा असता तर मी बसुन खाल्लं असतं' असा आक्रोश करणाऱ्या वडीलांची सेवा करुन त्यांच सांत्वन करेल अशी मनिषा आहे. भगवान महावीर, गौतम बुध्द यांच्याठायी असलेल्या क्षमाभावाचा दिपालीनेप्रत्यय दिला. म्हाताऱ्या आई वडीलांविषयी कर्तव्य भावनेचा विसर पडलेल्याकुलदिपकांच्या (वंशाचा दिवा) मुस्काटातदिपालीने सणसणीत चपराक दिली. "भृणहत्येची मानसिकता असणाऱ्यासमाजमनावर आघात करणारी अं:तर्मृख होण्यास भाग पाडणारी ही बाब आहे." दिपाली-रुपाली या चारित्र्यवान बहीणी आहेत. विपरीत परिस्थितीशी संघर्ष करतांना मनोबल टिकवुन ठेवणं ही असाधारण बाब आहे. एकविसाव्याशतकातील भौतिकतेच्या झगमगाटातचारीत्र्य संपन्न असणं, स्त्री सुलभ लज्जा असणं हीच खरी आभुषणे आहेत. दिपालीला बारावी (एच.एस.सी.), रुपालीला (एस.एस.सी.) दहावींच्या शैक्षणीक वर्षाच्यातयारीसाठी खुप-खुप शुभेच्छा। व सह्रदयींनामदतीचे आव्हान.
डॉ. प्रसन्नकुमार रेदासनी (जैन) संपर्क दुरध्वनी क्रमांक: ९४२२२७५१०८ 'बोध': धर्म-धर्म म्हणजे काय
? योग्य व्यक्तीसयोग्य
वेळी मदत म्हणजेच खरा धर्म. जगात दानशुर व्यक्तींची
कमी नाही. प्रत्येक पै-पै
चा योग्य विनियोगाची
हवी हमी.
आई वडीलांचे पुण्यस्मरण,
मुलामुलींचे
वाढदिवस, लग्नाचा वाढदिवसअनपेक्षीत
लाभाप्रित्यर्थ सामाजिकबांधीलकी ठेवणाऱ्या
व्यक्तींनाआपल्या दान दिलेल्या
पैशांचा सदुपयोगहोईल का? ही शंका भेडसावत असते.
तरी समाधान म्हणून नेहमीच्या
प्रचलितसमाजसेवी संस्थांना
मदत केली की,
दाता निश्चिंत
होतो. काही सेवाभावी
संस्थांना
वाजवी पेक्षा अधिक मदतमिळत
असते. अशा संस्थांना मिळालेली
अधिक मदत
भ्रष्टाचाराला कारणीभुतठरते.
मदत करणारे हात हजार आहेत,
दान दात्यांचे
हातभार दिपाली-रुपाली सारख्या गुणी
मुलींना लाभले तर त्यांच्याआयुष्याचं
सोन होईल ते सत्पात्री
दान असेल.
दात्यांना अभिप्रेत असलेल्यामदतीच्या
स्वरुपाची अंमलबजावणी
करु. आमचं
काम कोरीअर सेवेचं. दाताव गरजु
यांचा दुवा. सामाजिक उपक्रमातआमचाही
खारीचा वाटा. क्षमता विकासप्रबोधनाचं
काम करु या. असे सत्कर्म
करण्याची
सुवर्ण संधी लाभावी म्हणून
आम्ही "तुमचा पैसा
समाजासाठी Your Money for Society" या बॅनरखाली
दाते व गरजु यांचा दुवाम्हणून
सुवर्ण मध्य साधनार आहोत.
|
|
|
|
डॉ. प्रसन्नकुमार रेदासनी (जैन) मो. नं. ९४२२२७५१०८ |
|