Marathi Article Series Feedback
Name:*  
E-mail:*
 
Message:*
 
 
प्रेम
 
 
(डॉ. प्रसन्नकुमार, प्रमोदकुमार रेदासनी)
 
 

 
 

बादशहा शहाजान अतिशय भावुक संवेदनशील राजा. बादशाहाच्या प्रेमाची परीणिती म्हणजे ताजमहाल! एक उत्कृष्ट वास्तुशिल्प!! जगातील सात आश्चर्यापैकी एक आश्चर्य! माणसांनी ताजमहाल उभा केला यावर तुमच्या- आमच्या सारख्या माणसांचा आजही विश्वास बसत नाही. साक्षात परमेश्वरच शिल्पकार म्हणून वसुंधरेवर अवतरला असेल अस वाटत. ताज म्हणजे यमुनेच्या तिरावरील कधीही न कोमेजणार अमर प्रेमपुष्प. बादशाहाच्या असीम प्रेमाचा प्रतीक!

परिस्थितीने जरजर झालेला अत्यंत हलाखीचं जीवन जगणारा पण मनाने श्रीमंत अशा शायराने ऎश्वार्याचा आधार घेऊन प्रेमाला अजरामर करण्याच्या शहाजानच्या कृतीवर जोरदार आक्षेप घेवुन निषेध नोंदवला आहे तो असा -

                "एक बादशाहाने बनाकर ताजमहल,
                हम गरीबों की महोब्बत का उडाया है मजाक"

ताजमहाल म्हणजे प्रेम-दर्शन नव्हे तर राजसत्तेचा आधार घेवुन श्रीमंतीच प्रदर्शन. यशस्वी किंवा अयशस्वी गरीब प्रेमवीरांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा हा प्रकार. खर म्हणजे बादशाह आणि शायर दोघेही आपआपल्या भुमीकेशी प्रामाणिक. दोघांचा प्रेमाविषयीचा समर्पण भाव कुणीही नाकारु शकणार नाही. प्रेमा तुझा रंग कसा? प्रेम म्हणजे शृंगार, रस, भक्ती रस; वीर रस कधी वात्सल्य तर कधी कर्तव्य व बलिदान. प्रेमा तुझे अनेक रंग!

राधा-कृष्णाचं प्रेम श्रुगांर व समर्पणाच्या भावनेने ओतप्रोत तर संत मीराबाईच्या प्रेमाला भक्तीरसाचा मोठा मजबुत आधार. वैवाहिक जीवनात राम-सीतेचा आदर्श, प्रेमाचा दाखला दिला जातो. एका दानवीने हिडींबेने भिमावर केलेल्या असिम प्रेमाचा दाखला महाभारतात दिला आहे. एकट्या भीमाकरताच नव्हे तर उर्वरीत पांडवांच्या संरक्षणाकरीता घटोत्कचाचे दिलेले बलिदान विस्मयचकीत करणारं. हे झाल मानव देव-दानवाच्या समर्पणाच विवेचन. खरं म्हणजे कबुतर, शहामृग पक्षी देखील आयुष्यभर आपल्या एकाच जोडीदाराशी इमान राखुन असतात, पण हल्लीच्या काळातील अयशस्वी प्रेम विवाहाचं प्रमाण बघता प्रेम म्हणजे वासनेचं प्रदर्शन असा समज होतो. वासना शमली की लगेच प्रेमाच भुत उतरतं मग प्रेमी युगलांना व्यवहार कळायला लागतो, एकमेकांची अडचण वाटायला लागते, मग घटस्फोट. आज प्रेम, उद्या विवाह व परवा घटस्पोट अशी सद्यास्थिती आहे. प्रेम या संकल्पनेलाच तडा गेली आहे. आंधळ्या प्रेमाविषयी डोळसपणे विचार करण्याची वेळ येवुन ठेपली आहे. तरुण तरुणींना अंन्तर्मुख व्हावं नाहीतर आप्त स्वकीयांच्या वाटेला दु:ख आणि दु:खच !

प्रेम म्हणजे आसक्ती नव्हे. शारिरिक आकर्षणाने मनावर केलेला कब्जा म्हणजे प्रेम झाले? असे नव्हे, प्रेम म्हणजे फक्त दोन जिवांचे मिलन नव्हे - प्रेम दोन कुटूंबियांचे आप्तस्वकीयांचे मनोमिलन. प्रेम म्हणजे दोन जिवांनी जवळ येवुन आप्तेष्टांनी दूर जाणे असे नव्हे, एक नव नातं निर्माण होत असतांना जुन्या नात्यांची सुध्दा जपवणुक करणे. नैसर्गिक भावनांचा अनियंत्रित अविष्कार म्हणजे प्रेम नव्हे - प्रेम म्हणजे एकाने दुसऱ्यासाठी किंवा परस्परांकरीता जीव गमावणे. आत्महत्या करणे असेही नव्हे - प्रेम म्हणजे शुध्द पवित्र भावनांचा अविष्कार! मनाच्या बंदिस्त कोठडीत नाजुक भावनांची जपवणुक. प्रेम म्हणजे सर्वस्वाचा त्याग!

जन्मदात्री आई नऊ महीने उदरात सांभाळते. स्वत:च्या सुख: दुख:ची पर्वा न करता जीवापलीकडे जपते तुम्हाला! तुमच्या पहिल्या श्वासाकरीता! मग तुम्ही त्यांची मर्जी राखण्याकरीता वाट बघितली तर त्यात काय विशेष? गर्भवती स्त्रीला अपत्याला जन्म देणे हेच तिच्या हातात असत. तिच्या मनाला दुसरा विचारसुध्दा शिवत नाही. मग आम्ही मोठे झाल्यावर जन्मदात्या आईपेक्षा आपल्या आयुष्यात नंतर आलेल्या प्रेयसीला प्राथमिकता देतो, हे न्यायोचित आहे का? आईच्या पोटात असतांना व जन्म देते वेळी तिला होणारा असह्य वेदनेचं आम्हाला खऱ्या अर्थाने भान असले तर समज आल्यापासुन कोणत्याही व्यक्तीने स्त्री अथवा पुरुष आपल्या जन्मदात्यांचं दु:खांच जाणतेपणी तरी निमित्त होवु नये. प्रवाहाच्या विरुध्द जात आहात तेव्हा तुमच बाहुबल किंवा मन:सामर्थ प्रचंड हवं. उदात्त भावनेच्या आवरणाखाली जर शारिरिक भुकेची पुर्तता करण्याकरीता बंड असेल त्याला प्रेम म्हणावे का? विचारांनी प्रभावीत होवुन एखाद्या उच्च ध्येयाकरीता शारिरिक आकर्षणाचा व्यवहार न होता जर एकत्र येत असतील तर ते प्रेम, शुध्द प्रेम. स्त्रीच्या सौदर्यांची भुरळ पडुन पुरुषाच्या मर्दानगीवर फीदा होऊन दोन जीव एकत्र आले असतील तर त्याला प्रेम म्हणावे का व्यवहार?

प्रेम दोन अक्षरात बंदिस्त दोन कुटुंबियांना उध्दवस्त करणारी अशी संकुचीत संकल्पना नसुन प्रेम म्हणजे प्रेरणा. प्रे-Pray म्हणजे प्रार्थना, म-म्हणजे मनापासुन केलेली, ईश्वराला मान्य असेल तर स्विकार, ईश्वराला मान्य नसेल तरी स्विकार. भक्ताने मन:पूर्वक प्रार्थना करावी तिचा स्विकार किंवा अव्हेर ही बाब मर्त्य मानवाच्या इच्छेच्या अंकीत नाही. खिलाडु वृत्ती जपावी. प्रत्येक मॅचमध्ये यश येईलच असे नव्हे, जिंकण्याची मनिषा जरुर बाळगावी पण वैध मार्गाने!

प्रेम म्हणजे हळुवार सुखद भावनांनी ओथंबलेल्या ओलेचिंब झालेल्या वृक्षवल्लींना भरभरुन आलेली सुंदर सुंदर फुलं. ही फुलं सभोवतालचं वातावरण सुगंधीत, मधुर आल्हाददायक धुंदफुंद करतात, कुलुषीत नव्हे! प्रेम ही ईश्वराची निर्मिती आहे. ईश्वरी शक्तीचं अपत्य आहे. ईश्वराची प्रत्येक निर्मिती मानवी जगाला प्रेरणादायक असली पाहीजे. "आर्ट ऑफ लिव्हींगचे" चे प्रणेते श्री श्री रविशंकर म्हणतात 'सत्याला सामोरे जाण्याचे सर्वोत्तम मार्ग म्हणजे त्याला मंजुर करणे'. प्रेम करायचं नसतं ते आपसुक होतं इथपर्यंत ठिक आहे पण तरुणांनी सारासार विवेक पूर्वक विचार करावा. आपली कौटुंबिक पार्श्वभुमी, व समाजमनाचे भान ठेवावे. नंतर होणारी भावनिक पडझड ओढाताण परवडणारी नसते. नवीन नाती जुन्या नात्यांना वृध्दींगत करणारी सुखावणारी हवी. दुख:च्या खाईत लोटणारी नव्हे. खर म्हणजे तरुणांनी स्वत:च्या पलीकडेही विश्व असत याच भान ठेवावं. प्रेम म्हणजे मदहोष करणारा "एकच प्याला" नव्हे. कानेटकर लिखीत नाटकात शिक्षक आपल्या वाया गेलेल्या विद्यार्थ्यांविषयी व्यथा व्यक्त करतांना म्हणतात

"मी लावल्या होत्या अमृताच्या वेली,
अणि त्याला लागली हलाहलाची फळं।"

असच परमेश्वराला त्याचा 'प्रेम' या अपत्याबद्दल वाटु नये. प्रेम या उदात्त संकल्पनेच पावित्र्य जपु या.

"आपल्या पलिकडिल जगाचे विचार करा" म्हणजे सुख आनंद मिळेल. क्षितीज ही कल्पना आहे, वास्तव नाही. मृगजळ शब्दसंग्रहापुरता मर्यादित शब्द आहे पण त्याच अस्तित्व नाही, आहे फक्त आभास । फसवं, चकवणारं. जस आभाळ धरणीला कधीच स्पर्श करत नाही फक्त आभास असतो तसेच आमचे भावविश्व असते. आमच्या भावनांना, अपेक्षांना मुरड घालावीच लागते. भावनेच्या भरात गळफास, विषप्राशन, आत्महत्या हे सुध्दा प्रेमाच्या जीवंतपणाच लक्षण नव्हे. प्रेयसीवर तेजाब फेकणे, तिचा चेहरा विद्रुप करणं ही तर मानसिक विकृती. पळुन जावुन लग्न करण हा जन्मदात्याचा शुध्द विश्वासघात ! मान खाली घालुन लाजीरवाणं जीवन आई वडीलांच्या वाटयास येईल अस कोणतेही आतातायी कृत्य म्हणजे पवित्र प्रेम नव्हे, ही तर वैचारीक दिवाळखोरी. तुमचं प्रेम खरं असेल तर जोपर्यंत दोघा तरुण तरुणींना जन्मदात्यांची समंती मिळत नाही तोपर्यंत वाट बघत राहणं हेच सुसंस्कृतपणाच लक्षण आहे. प्रेम म्हणजे सर्वस्वाचा त्याग ! हे प्रेमवीरांच वैचारिक अधिष्ठान असायला हवे.

 
 

डॉ. प्रसन्नकुमार रेदासनी (जैन)
मो. नं. ९४२२२७५१०८

 


Yatra Tatra Series Home Page | EJalgaon.com Homepage